Ad will apear here
Next
‘भाऊसाहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान’
भाऊसाहेब फुंडकरनागपूर : ‘भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावावर चर्चा झाली. त्यावेळी शोकप्रस्तावावर विचार व्यक्त करतानाच मुंडे यांनी भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.

‘भाऊसाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आणि जेव्हा शेतकऱ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली त्याचवेळी नेमके ते सोडून गेले. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. भाऊसाहेबांचे नेतृत्व हे खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे नेतृत्व होते. भाजपचे कर्मठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जास्त ओळख होती. त्यांनी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भाजप पोचवली’ असेही मुंडे म्हणाले.

भाऊसाहेबांनी भाजपसाठी आयुष्य वेचले. सत्ता आल्यानंतर पहिल्यावेळी मंत्रीपद मिळू शकले नाही; मात्र त्यांनी कधी नाराजी दाखवली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWZBQ
Similar Posts
नव्या मतदारांवर भाजपचे लक्ष नागपूर : आगामी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासून तयारी चालविली आहे. निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव्या मतदारांना आतापासूनच आपलेसे करण्यासाठी भाजपने योजना आखली आहे. या मतदारांची नोंदणी करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे नागपूरमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चातर्फे १९ व २० जानेवारी २०१९ रोजी नागपूर येथे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून, या महाअधिवेशनाला भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे देशभरातील सहा हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, तर २० जानेवारीला होणाऱ्या जाहीर सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language